Back to feed
K
Kavya Singh family · marathi · family

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - मी कसा दिसतो ते सांग बायको म्हणाली — मेघनादरिपु तात वधी ज्या नराला । ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 🤔🤔🤔 नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना म्हणून त्यांने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यानी सांगितलेला अर्थ खाली देत आहे. मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ? तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ. दशरथाच्या हातून अजाणता कोण मारल्या गेला ? तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ? तर पोळा . पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .( त्या दिवशी बैलाला सजवतात ) त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात. 😂😂😂 *(नवरा मानसिक धक्क्यातून अद्यापही सावरलेला नाही)*

146 likes 11 shares
WhatsApp