Back to feed
R
Reyansh Sharma Good_Morning · Marathi · Life

*पु. ल. म्हणतात -* *खर्च झाल्याचं दु:ख नसतं*, *हिशोब लागला नाही की त्रास होतो...* *शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...* *माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...* *रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...* *पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...* *सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...* *कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...* *रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते...* *तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...* *आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...* *ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...* *आयुष्य फार सुंदर आहे...* *ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...* *माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...* सुप्रभात 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏼🌹

59 likes 85 shares
WhatsApp