Back to feed
V
Vanya Kulkarni life · marathi · life

* पाउलखुणा * आठवांच्या गावातुन चालताना दिसतात तुझ्या पाउलखुणा पुन्हा जवळ येतो मी तुझा होतांना पालवी फुटे भावनांना स्पर्श तुझा होतांना मन होई बावरे पुन्हा तुला बघतांना नाहीस तु तरी मन मान्य करेना वा-याची येता लहर पाहतो तुला येतांना आठवांच्या गावातुन फिरतांना माघारी परतु वाटेना न्याव्यात सोबत कायमच्या आज तुझ्या पाउलखुणा...

9 likes 36 shares
WhatsApp