*पोटी एक मुलगी जरूर असावी ...* *पोटी एक मुलगी जरूर असावी...* तीच्या जन्मावर आनंदाने बर्फी वाटण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बेटी धनाची पेटी, असे बाबाला गर्वाने म्हणण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* प्रेमाने पहिला शब्द, बा ss बा म्हणण्यासाठी .. *पोटी एक मुलगी जरूर असावी...* इवल्याश्या पायात पैंजण घालून, छूम छूम घरात धावण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* छानसा फ्रॉक घालून ,परी भासण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बाबा माझा सुपरमॅन , असं म्हणण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* रोज संध्याकाळी, दमलास का रे बाबा आज असं म्हणण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* लगेच राग सोडून, बाबाला मिठी मारण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बाबाचे अश्रू हळूच पुसण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* रडू नको ना बाबा म्हणण्या साठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* मुलगी असून आईची माया देण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* शाळेत सोडायला तूच ये , असं बाबा जवळ हट्ट धरण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* आई पेक्षा मला बाबा आवडतो, असं म्हणण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* उमेदीने तिचा मुद्दा ,बाबाला पटवून देण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* आई चिडल्यावर, बाबाच्या मागे लपण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बाबाला कन्या दानाचे सुख देण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* सासुराला जातांना, बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* पाडवा सणाला ,बाबाला भारी साडी मागण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बाबाला बरं नाही, म्हंटल्यावर धावत माहेरा येण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बाबाचे, बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी ... *पोटी एक मुलगी जरूर असावी...* बाबा गेल्यावर, सगळ्यात जास्त शोक करण्यासाठी ... *_पोटी एक मुलगी जरूर असावी ..._* *_पोटी एक मुलगी जरूर असावी ..._*
211 likes
68 shares