A
Aditya Bhat
Love · Marathi · Heartbreak
पाठीशी तीला घालताना आईची बोलणीखावी, नंतर मात्र तीलाचं एक ठेऊन द्यावी.. एक बहिण असावी.. चीडवायला तीला फार मजा यावी, पण रडू ती लागताचं जिवाची घालमेल व्हावी.. एक बहिण असावी.. पहिल्या माझ्या पगारात तीला छान गिफ्ट आणावी, आणि गिफ्ट हातात पडताचं तिने वर पार्टीही उकळावी.. एक बहिण असावी.. असेचं आणि बरेचं नेहमी मला वाटे, एक बहिण असावी.. पण ????? मला बहिण का नसावी ? त्यामुळे राखी पोर्णिमा माझी सूनीसुनी जावी.. आणि अचानक आयुष्यात माझ्या एक छोटुकली यावी.. सख्खी नसेल तरीही सख्ख्याहून सख्खी वाटावी.. एक बहिण यावी.. तीच्याशी बोलताना माझी सुःख दुःखे सांगावी, सांगता सांगता तीचीही जाणून घ्यावी.. खरचं घर मुलीशिवाय अपूर्ण असतं.
0 likes
0 shares