Back to feed
A
Avni Kumar life · marathi · life

पुणेकर विरुद्ध आंब्याचा व्यापारी 😁😁😁😁 पुणेकर : अडीच डझनची पेटी दाखवा, पण मी पेटी उघडून बघणार. व्यापारी : बघा साहेब! पण भाव कमी नाही होणार. पुणेकर : अरे अस्सल रत्नागिरी दिसतोय. व्यापारी : अरे वा! बरोबर ओळखले तुम्ही. पुणेकर *(मनात)* : मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो. मी तर पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमान पत्राचा कागद होता. व्यापारी *(मनात)* : अरे पुणेकरा मी पण हाडाचा व्यापारी आहे. मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो. बाकी माल कर्नाटक चा आणतो. 😀😀😀

98 likes 70 shares
WhatsApp