पुण्यात..... पुण्यातील गण्याला किराणा कम स्टेशनरी स्टोअर मध्ये नोकरी मिळाली. एके दिवशी एक बाई स्टोअर मध्ये आली. बाई :- मँगो जाम दे. गण्या :- मॅडम, मँगो जाम आऊट ऑफ स्टाॅक. बाई काहीही खरेदी न करता निघून गेली. दुकानदार हे सर्व पहात होता. तो गण्याजवळ आला आणि म्हणाला " जर गिर्हाईकाने एखादी वस्तू मागितली अन् ती आपल्या कडे नसेल त्याला त्याच पध्दतीची दुसरी वस्तू विकत घेण्यासाठी आग्रह करायचा. उदाहरणार्थ मँगो जाम नव्हता तर तिला तू पाईनापल जाम, अॅपल जाम किंवा ऑरेंज जाम साठी विचारू शकत होता." काही वेळानंतर दुसरी बाई आली आणि तिने गण्याला विचारले " टॉयलेट पेपर आहेत का ?" गण्या शांतपणे म्हणतो कसा "मॅडम, सध्या तर आमच्या कडे शिल्लक नाही. पण तूम्ही त्या ऐवजी कार्बन पेपर, पाँलिश पेपर नाहीतर सँड पेपर वापरून पहा." त्या बाई ने गण्याला बदडलाच पण जाताना दुकानदाराच्या पण कानाखाली काढली. 😂😆😂😆
N
Nisha Kumar
humor · marathi · humor
101 likes
37 shares