Back to feed
K
Kavya Iyer Good_Morning · Marathi · Life

पत्रकार :* बाबाजी, तुमचे वय किती आहे ? वारकरी :* ६५ वर्षे आहे बेटा. पत्रकार :* तुम्ही किती वर्षापासून पंढरपूरला येत आहात ? वारकरी :* जवळपास ५० वर्षापासून. पत्रकार :* तुम्हाला विठ्ठल दिसला का..? एकदा तरी..? वारकरी :* नाही बेटा, नाही दिसला. पत्रकार :* तरमग तुम्ही का बरे येता दरवर्षी? वारकरी : गावाकडे आम्ही घरात कुत्रा पाळतो, तुमच्यासारखा फॅशन म्हणून नव्हे तर चोरांपासून संरक्षणासाठी. रात्रीच्यावेळी एका कुत्र्याला चोर दिसला की तो जोरात भुंकायला लागतो, ते ऐकून आजूबाजूच्या घरातले २० कुत्रेपण भुंकायला लागतात. २०पैकी १९ कुत्र्यांनी चोराला बघितलेले नसते, पण पहिल्या कुत्र्यावर विश्वास ठेवून ते भुंकायला सुरूवात करतात. जर जनावरं एकमेकांवर विश्वास ठेवू शकतात तर माणूस माणसावर का नाही? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि अशा अनेकांनी विठोबा पाहिला आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे, की एक दिवस मलाही विठ्ठलाचे दर्शन होईल...! 🙏🏼🙏🏼 आपल्या सर्वांमध्ये असणाऱ्या श्रीहरी विठ्ठलास माझा नमस्कार. 🙏🏼🙏🏼 "जय हरी विठ्ठल" 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

171 likes 40 shares
WhatsApp