पोरं झोपत नाहीत तेव्हा "झोपा झोपा" म्हणून लकडा लावतात . पोरं झोपली कि "उठा उठा" चा गजर . पोरांना नेमकं वेळेवर उठून काहीतरी गाठायला जायचं असतं आणि या खिडकीपाशी दबे पांव जाकर " मुलांच्या तोंडावर उन्ह येतं ना " म्हणत पडदे काय ओढून घेतात , खिडक्या लावून गुरमुट अंधारच काय करून टाकतात . मध्यरात्री पाणी प्यायला उठल्या आणि पोरांच्या खोलीत उशिरापर्यंत उजेड दिसला कि दारावर टकटक करून झोपा आता म्हणत अख्ख्या घराला उठवतात . पोराने "दोनच पोळ्या" बरं का , म्हंटल तरी मुद्दाम चतकोर चतकोर केल्यासारखं भासवत तीन पोळ्या डब्यात भरतात . अर्धी पोळी वाढ म्हंटल्यावर ८० : २० असे दोन तुकडे करून पैकी ८० वाला तुकडा निष्पाप चेहऱ्याने पोराच्या ताटात वाढतात . आणि त्याच पोराला , " वजन वाढतंय , जरा व्यायामाचं बघा " म्हणत पकवतात सुद्धा . पोर जेवलं नाही तरी डोळे ओले करतात , पोराने आवर्जून अमूक कर सांगितलं तरी कौतुकाने हळूच स्वतःचे डोळे टिपतात . पोर नाहीनाही म्हणत असताना त्याचे कप्पे कपाटं आवरतात आणि बोलणी खाल्ली कि तोंड एवढंसं करून बसतात . " या विषयावर आयुष्यात परत काही बोलणार नाही " म्हटलेले शंभर विषय चुनचुनकर त्यावर नव्या दमानं लेक्चर मारत राहतात . सरते शेवटी " मीच वेडी आहे " असं शिक्कामोर्तब करतात . काय काय नि किती किती , या आई नावाच्या बाया जरा येड्याच असतात . एकूणच आई असणं म्हणजे वेडच नै तर काय !👧👸👰🌺🌸🌼🌻🌹🌷💐
10 likes
88 shares