Back to feed
K
Kabir Das Family · Marathi · Family

परिणामाची तमा मी कधी बाळगलीच नाही. ज्यावेळी जे योग्य वाटलं ते करत आलोय. विचार करण्यात खूप वेळ घातला नसला तरी कोणतंही पाऊल अविचाराने टाकत नाही. त्यामुळेच आजवरच्या कोणत्याच निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही. प्राप्त परिस्थितीत जे-जे चांगलं करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करत असतो. जे व्हायचं ते होईल. त्याचा अधिक विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःशी स्पर्धा करुयात... कालच्यापेक्षा अधिक चांगलं आज काय करता येईल यासाठी प्रयत्नशील राहूयात.... सगळं चांगलंच होईल, त्या परमेश्वरावरही विश्वास ठेऊयात....

239 likes 80 shares
WhatsApp