Back to feed
R
Rudra Das love · marathi · romantic

परतीच्या वाटेवर, ती अचानकपणे भेटली...! ओळख ना पाळख, माझ्या सोबत चल म्हणाली...! मी निर्लज्ज होऊन, तिच्या सोबत निघालो...! दिशा तिच पण, वाट नवी होती...! धागा तोच पण, गाठ नवी होती...! सृष्टी तिच पण, भास नवा होता...! आयुष्य तेच पण, श्वास नवा होता...! सोबत तिच पण, हात नवा होता...! हृदय तेच पण, तेज नवे होते...! मी चालत होतो, मी बोलत होतो, तिच्या सोबत खुश होतो...! चालता चालता शेवटी आम्ही, तिच दुनिया गाठली...! पुन्हा तिथेच येण्याची, माझी मलाच लाज वाटली...! रागावलो तिच्यावर, रागातच विचारलं तिला...! "माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवयं मला...!" ती गालातच हसली, जवळ येऊन बसली...! “ज्या जगापासुन दुर जात होतो, त्याच जगात मला का आणलस...? प्रेमात अडकलेल्या माझ्या मनाला, परत प्रेमानेच का विणलस..?” “हेच तर तुझं जग आहे, इथेच तर तुला यायचं होतं...! त्याच जगातली मी एक आठवण, मला तिथेच तर तुला न्यायचं होतं.

220 likes 22 shares
WhatsApp