प्रत्येक जोडप्याने एकदा जरुर वाचा खूप गैरसमज दूर होतील ! स्त्रिया संपूर्ण दिवसात देहबोली व हावभाव धरून सुमारे २० हजार शब्द बोलतात; तर पुरुष सात हजार शब्द बोलतो. पुरुष दिवसभर घराबाहेर सात हजार शब्दांचा साठा संपवून घरी येतो. स्त्री दिवसभर घरीच असेल, तर तिचा शब्दसाठा शिल्लक असतो. शब्दसाठा संपल्यामुळे पतीची बोलायची इच्छा नसते. पत्नीला मात्र किती बोलू असं होतं. नवरा ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यास त्याचं आपल्यावर प्रेमच नाही, असं तिला वाटतं व वातावरण बिघडायला सुरुवात होते. पुरुषाचा नैसर्गिक शब्दसाठा सात हजारच असतो, हे पत्नीला माहीत असतं, तर भांडण टळलं असतं. मागच्या पिढीपुढे ही समस्या नसायची. एकत्र कुटुंबात खूप माणसं, त्यामुळे स्त्रीचा २० हजार शब्दांचा साठा पुरा व्हायचा; पण आता मोबाईलवर बोलूनही व नवऱ्यानं प्रतिसाद न दिल्यानं तिचा हा शब्दांचा साठा पूर्ण होत नाही. ती निराश होते व बोलण्याची स्वाभाविक इच्छा पूर्ण न झाल्यानं संबंध बिनसतात. पती-पत्नी एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादतात आणि आपल्या आवडीनिवडी, सवयी सारख्या असाव्यात, असा आग्रह धरतात. पण आपल्या साथीदाराला निसर्गनियमाला अनुसरून ‘स्पेस’ व स्वातंत्र्य द्यायला हवं. एकमेकांना समजून घ्यायला हवं. अहंकाराला तिलांजली देऊन जुळवून घेण्याची मानसिकता ठेवली, तर जीवनवेलीवरच्या फुलांना बहर येईल. Have a nice relationship 🌹
221 likes
2 shares