Back to feed
K
Kabir Sharma love · marathi · romantic

~~~प्रेम प्रेम प्रेम~~~ प्रेम करणे सोपे आहे की कठीण आहे ??? हेच मला नाही कळले अजून कोणी मला सांगेल का ..... प्रेम करणे सोपे आहे का कठीण ??? प्रेम करणे कठीण नाही पण ते निभावाणे कठीण आहे ...का ??? प्रेमात गुन्तत जाणे सोपे आहे ..... पण ते आयुष्य भर टिकवणे सोपे आहे का... ??? प्रेमात विश्वास आहे माझा!!! हे बोलणे सोपे आहे पण तोच विश्वास ठेऊन संसार करणे सोपे आहे का...??? हातात हात धरून चालणे कठीण नाही .... पण हात धरून आयुष्य काढणे कठीण आहे का... ??? प्रेमात वचन देणे सोपे आहे पण तेच वचन निभावणे सोपे आहे का...??? प्रेमात तास तास फोन वर बोलणे सोपे आहे. पण फोन चे बिल भरणे सोपे आहे का.... ??? प्रेमात खोटे बोलणे सोपे आहे. पण खोटे बोलून प्रेम टिकवणे सोपे आहे का ??? प्रेमात महागडे गिफ्ट देणे कठीण नाही पण गिफ्ट साठी पैसा साठवणे कठीण आहे का ...??? प्रेमात मी तुझ्या बरोबर लग्न करेन बोलणे सोपे आहे. पण लग्नाच्या वेळी घरच्या माणसांना पटवणे सोपे आहे का ??? प्रेम करणे सोपे आहे की कठीण आहे ???

34 likes 7 shares
WhatsApp