Back to feed
M
Myra Mehta Spiritual · Mixed · Spiritual

*●प्रेरणा कशास म्हणतात●* *न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते...!!!!* *आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता...!!!!* *बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे...!!!!* *यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते...!!!!* *मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले...???* *तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते...!!!!* *शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती...???* *तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या...???* *आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता...???* *हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते...!!!!* *मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते...!!!!* *सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते...!!!!* *आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो...!!!!* *आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो...!!!!* *भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो...!!!!* *पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो...!!!!* *पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो...!!!!* *माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का...???* *कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का...???* *वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का...????* *लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का...???* *आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का...???* *निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो...!!* *प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो....!!* *शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो...!!* *आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो...!!* *शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो...!!* __________________________ Absolutely true post.... 💚💓💚💓💚💓💚💓💚💓💚💚💓💚💓💚💓💓💓💚

205 likes 38 shares
WhatsApp