Back to feed
A
Atharv Sharma friendship · marathi · friendship

प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून. प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४ ओळीत) माहिती लिहा. उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत. ------------------------------ प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो. उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो. खालील बाबतीत काय होईल ते सांगा- जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास---- उत्तर- ग्लास काळा होईल. मराठीत भाषांतर करा. चिडियां पेडपर चहचहाती हैं । चिमण्या झाडावर चहा पितात..........

115 likes 55 shares
WhatsApp