पुरुषानीही रडण्यासाठी एक कविता 🙎|| लेक माझी ||🙎 . 🙎अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते नाव सुद्धा माझं ती इथेच ठेऊन जाते।।🙎 . 🙎पहिला घास, देवा, ती माझ्या कडून खाते माझाच हात धरुन ती पहिलं पाऊल टाकते।।🙎 . 🙎माझ्याकडूनच ती पहिलं अक्षर शिकते तिच्यासाठी सुद्धा मी रात्र रात्र जागतो।।🙎 . 🙎कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवुन बसते मी आणलेला फ्रॉक घालून घर भर नाचते।।🙎 . 🙎अशी कशी लेक, देवा, माझ्या पोटी येते असे कसे वेगळे हे तिचे माझे नाते।।🙎 . 🙎एक दिवस अचानक, ती, मोठी होऊन जाते बाबा , तूम्ही दमला का, ? हळूच मला विचारते॥🙎 . 🙎माझ्या साठी कपडे, चप्पल, खाऊ घेऊन येते नव्या जगातील नविन गोष्टी मलाच ती शिकवते।।🙎 . 🙎तिच्या दूर जाण्याने कातर मी होतो हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते।।🙎 . 🙎कळत नाही मला, देवा, असे कसे होते कधी जागा बदलून ती माझीच आई होते।।🙎 . 🙎देव म्हणाला, ऐक, पोरी तुझे, तिचे नाते विश्वाच्या ह्या साखळीची एक कडी असते।।🙎 . 🙎🙎तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते सावली आणि सुगंधाशी तर तुझेच नाते असते।।🙎🙎 . 🙎🙎वाहत्या प्रवाहाला, कोणी, मुठीत कधी, का, धरते ? मार्ग आहे ज्याचा, त्याचा पुढेच असते जायचे।।🙎 . 🙎तुझ्या अंगणातली धारा ही "जीवनदात्री" होते आणि वाहती राहण्यासाठीच "गंगा" ""सागराला" मिळते। एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी नाजूक नखरे करताना न्याहाळायला मिळावी 🙎🙎 . 🙎एक तरी मुलगी असावी साजिरी गोजिरी दिसावी नाना मागण्या पुरवताना तारांबळ माझी उडावी🙎🙎 . 🙎एक तरी मुलगी असावी मैचींग करताना बघावी नटता नटता आईला तिने नात्यातली गंमत शिकवावी🙎🙎 . 🙎🙎एक तरी मुलगी असावी जवळ येऊन बसावी मनातली गुपितं तिेने हळूच कानात सांगावी 🙎🙎 . 😊😊एक तरी मुलगी असावी गालातल्या गालात हसावी कधीतरी भावनेच्या भरात गळ्यात मिठी मारावी......! 🙎एक तरी मुलगी असावी 🙎 dedicated to all beautifull doughters 😊
229 likes
8 shares