Back to feed
M
Manav Das love · marathi · romantic

पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वादळाने अचानक पडलं. दोघं जणं शब्द संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं, थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली. "सकाळी बोलूयात’, तो म्हणाला, "हो’, ती म्हणाली. रात्र संपायची वाट बघत दोघे बसून राहीले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.तो उत्साहानी म्हणाला, "निघूयात ? नव्यानी काड्या आणू. तिच्या डोळ्यात पाणी आले. "अग वेडे," पाडणं” त्याच्या हातात आहे तर " बांधण ” आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणस थोडीच आहोत! " चल निघूयात ” आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली आपल्या होणार्या पिल्लांसाठी......

81 likes 65 shares
WhatsApp