A
Anika Deshmukh
love · marathi · romantic
पहाटेच्या मंद धुक्यात... दारातल्या बकुळीच्या झाडाखाली... प्रत्येक फुलाबरोबर.... एक एक आठवण वेचायची आहे.... मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे.... ऑफिस मधल्या कळकट कागदी धीगार्यातल्या... एका छानशा गुलाबी पानावर.... तुझ्यावरच केलेली कविता लिहून... तुला एक प्रेम पत्र धाडायचं आहे... मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे.... ऑफिसमधून धोंडा वेळ काढून सगळी काम जशीच्या तशी सोडून.. चांदण्यांनी गच्च भरलेल्या निशब्द आकाशाखाली.... सारी रात्र तुझ्याशी निवांत गप्पा मारत घालवायची आहे... मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे... संसाराच्या धावपळीतून.. अगदी थोडासा वेळ काढून... तुझ्या केसांत हळुवार हात फिरवत...मैत्रिणीची प्रेयसी कारायचं आहे... मला पुन्हा एकदा तुझ्याच प्रेमात पडायचं आहे....😍
219 likes
37 shares