Back to feed
V
Vihaan Kulkarni Birthday · Marathi · Birthday

फक्त एकदाच... आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना... प्लीज! आपण म्हणतो, मीच का नेहमी फोन करायचा, मीच का एसएमएस करु, आणि कधीतरी जिवाभावाचं माणूस अशा ठिकाणी निघून जातं, जिथे नेटवर्क पोहचत नाही, आपलं माणूस नॉट रिचेबल होण्यापूर्वी, एक फोन कराल त्यांना.. प्लीज..! आपण असतो फार बिझी, वेळचं नाही, कुठं जायला फुरसत नाही, जिवाभावाची माणसं आठवतसुद्धा नाहीत, आपण कधी पत्र लिहित नाही, ख्यालीखुशाली विचारत नाही, त्यांचे बर्थडे आपल्याला आठवत नाही, त्यांच्या आठवणींनी मन काहूर करत नाही.. आणि मग एक दिवस येतो निरोप, ते "नसल्याचा".. आणि जातो फक्त दारावर, कधीही न होणाऱ्या भेटीसाठी.. असं होण्यापेक्षा कधीतरी पाच मिनिट वेळ काढता नाही का येणार, थोडा वेळ भेटून गप्पा मारता नाहीच का येणार.. प्लीज.. त्या गप्पांना वेळ द्याच.. प्लीज.. हे सारं कळतं आपल्याला, पटतंही.. मात्र तरीही आपण आपल्याच आयुष्यात बांधलेले, आपले दोर काचलेले.. त्या काचल्या दोरांपायी कुणाशी शेवटची भेट झाली नाही असं होऊ नये.. आणि जिवंत असलेली माणसं कायमची दुरावू नये, म्हणून एकदाच.. मनापासून हाक माराल प्लीज.. आपल्या माणसांना..........॥

33 likes 25 shares
WhatsApp