फरक कुठे पडला आहे…. लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो| त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो| आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो| मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो| आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे| बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे| लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो| नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो| परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली| मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली| पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे| मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे| तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो| ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो| कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो| मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो| ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे| राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे| लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो| पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो| काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला| पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला| थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे| भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे| कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा| बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा| आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो| सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो| शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे| मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे| जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो| मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
91 likes
81 shares