बाईनी ५ वीच्या मुलाना गृहपाठ दिला :"उद्या येताना आईवडिलांची केलेली एखादी गोष्ट आणि त्याचे तात्पर्य समजावून घ्या. प्रत्येकानी वर्गात उभे राहून ती गोष्ट सर्वाना मोठ्यांदा सांगायची आहे..!" ...दुसरे दिवशी प्रत्येक मुलानी, नासलेले दुध, उतू गेलेले दुध, फाटलेले कपडे, आईवडीलानी पै पै वाचवण्यासाठी किती व कसे कष्टात दिवस काढले त्याची रसभरीत वर्णने केली... वर्गात सतत हुंदके, नाकाची सुरुसुर आणि दबलेल्या आवाजातील रडणे ऐकू येत होते... "मार्गारेट" एका कोप-यात बसून ते सर्व नीट ऐकत होती... तिच्या चेह-यावरती कोणत्याच प्रतिक्रिया नव्हत्या... शेवटी ती एकटीच उरल्यावर बाईनी विचारले, "मार्गारेट, तू कोणती गोष्ट सांगणार आहेस..?" मार्गारेट म्हणाली, "माझी आई फायटर विमानाची वैमानिक आहे, वडिलांनी मला "आईची शौर्य कथा" सांगितली..!" बाई पटकन म्हणाल्या "हो..? कोणती ग..? सांग सांग..! आम्हाला पण ऐकू दे..!" "आईची इराकच्या युद्धातील शौर्यकथा आहे... "आई f16 विमानातून बगदादवर मिसाईल वापरून हल्ला करत असताना, आखातात होणाऱ्या वाळूच्या वादळामुळे F16 बिघडले... मग काय आईला विमातून उडी मारावीच लागली... कोणत्याही फायटर वैमानिकाकडे पॅराशुट असतेच त्याशिवाय, एक पिस्तोल, एक धारदार चाकू आणि थंडी पासून संरक्षण करण्यासाठी एक व्हिस्कीची क्वार्टर पण असते..! पॅराशुट वापरून उतरताना आईच्या लक्षात आले की ती जर का वेडीवाकडी जमिनीवर पडली तर तिच्या खिशातील व्हिस्कीची बाटली फुटेल...आणि काचा लागून ती जखमी होईल आणि शत्रूच्या हातात सहज सापडेल... तिने एक सेकंद सुद्धा वाया जावू न देता, हवेत असतानाच व्हिस्कीची बाटली उघडून पिवून टाकली व जमिनीवर फेकली... तिला असे वाटले की ती बाटली ज्याच्या डोक्यावर पडली तो इराकी क्षणात मेला आणि तसे तिला तिच्या दुर्बिणीतून दिसले... पॅराशुट च्या साह्याने ती जमिनीवर उतरली तो नेमका इराकी सैनिकांचा अड्डा होता.. तिला त्यातील सर्व २० इराकी सैनिकांनी घेरले...आईने डोळ्याची पापणी लवायच्या आधीच पिस्तुलातून फायारिंग सुरु केले... आणि १५ इराकी सैनिक जागीच मारले... पिस्तुलातल्या गोळ्या संपल्या हे तिच्या लक्षात आले पण आता उरलेले ५ जण तिच्यावर धावून येत आहेत हे तिने बघितले... तिने क्षणाचाही विलंब न करता चाकू उघडला आणि एकेकाला भोसाकायला सुरवात केली... आणि ४ जणाना यमसदनाला पाठवले...चौथ्या इराक्यावर चाकू हल्ला करताना, तो चाकू त्या इराक्याच्या हाडाला लागल्याने तुटला... मग आईने तिचे कराटेचे सर्व ज्ञान पणाला लावून शेवटच्या इराकी सैनिकावर जोरदार हल्ला केला आणि त्याचा गळा दाबून जीव घेतला... तिने तिथल्या एका कपाटातून इराकी ड्रेस घातला अन् तिथली एक मोटारसायकल घेवून ती अमेरीकन बेसवर सुखरूप परत आली... या शौर्याकरता तिला प्रेसिडेंटने विशेष प्रशस्तीपत्रक व डबल बढती सुद्धा दिली... क्षणाच्या शांततेनंतर ५-६ मिनिटे सर्व मुले टाळ्या वाजवत होती .... पुन्हा शांतता प्रस्थापित झाल्यावर बाईनी विचारले.... "मार्गारेट...यातून तू काय धडा घे असे वडिलांनी सुचवले..?" मार्गारेटने इकडे तिकडे बघितले व हळू आवाजात म्हणाली... वडील म्हणाले... "बाई दारू प्यायली असेल तर तिच्या वाटेला जावू नये..!!!" 😜😂😝😝😝😝
K
Kunal Mehta
humor · mixed · humor
178 likes
49 shares