Back to feed
T
Tara Kumar Life · Marathi · General

बाईपणाच्या जातीला....! बाईपणाच्या जातीला घोर लागलेला शाप दूध तिचेच पिऊन कसे बनतात साप घाण कचरा काढला तिनं जिनगाणीभर अवकळ्या जगण्याला तिच्या घामाची झालर तिला डोहाळे मातीचे खाई निवडून खडे देते मातीला कसाया तिच्या आतले रूपडे तिचं जगणं मरणं तिच्या राबणा-या हाती कोणी नसतं रडत भाकडल्या गाईसाठी तिनं जलम घेऊन काय मोठं केलं पाप पाण्याविना रूजताना मेली होऊनिया वाफ कवी संतोष पद्माकर पवार (पिढीपेस्तर प्यादेमात )

145 likes 57 shares
WhatsApp