Back to feed
A
Avni Reddy Family · Marathi · Family

बंगळुरु, दि. ९ - फिल्ड ट्रीपच्या बहाण्याने ऑफीसमधील महिला सहका-याला कोदगू येथे नेऊन बॉसने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एप्रिलमध्ये घडली त्यावेळी २३ वर्षीय पीडित महिलेसोबत तिचा एका वर्षाचा मुलगाही होत. पीडित महिला बांधकाम साहित्याचा पुरवठा करणा-या कंपनीत कस्टमर केअर अधिकारी म्हणून जानेवारी महिन्यात रुजू झाली होती. येलहंका कोगीलू येथे या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीत रुजू झाल्यानंतर दोन महिन्यांनी कंपनीच्या टी. विवेकानंद या पार्टनरने लैंगिक सुखासाठी सदर महिलेला त्रास देणे सुरु केले होते. पीडित महिलेला हा त्रास असहय्य झाल्यानंतर तिने सदर पार्टनरला पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बॉसने महिलेला जाळण्यात ओढण्यासाठी फिल्ड ट्रीपचा कट रचला. कंपनीची कोदगू येथे फिल्ड ट्रीप ठेवली. या ट्रीपला येणे प्रत्येक कर्मचा-याला बंधनकारक केले. पीडित महिलेची आई कोदगू येथे रहात असल्याने ती तयार झाली. अन्य बिझनेस पार्टनरही सोबत असल्याने पीडित महिलेला कोणताही संशय आला नाही. तिने आपल्या वर्षाच्या मुलालाही सोबत घेतले. आरोपीने विराजपेठ येथे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एक रुम बुक केली. आरोपीने पीडित महिलेला त्या रुममध्ये रहायला भाग पाडले. आरोपी आणि त्याचा बिझनेस पार्टनरही त्याच रुममध्ये थांबला होता. दुस-यादिवशी सकाळी दुसरा बिझनेस पार्टनर कामानिमित्ताने तातडीने बंगळुरुला निघून गेला. आरोपीने हिच संधी साधून घेतली. त्याने पीडित महिलेच्या आंघोळीचे चित्रीकरण केले. त्याने महिलेला तो व्हिडीओ नव-याला दाखवण्याची आणि ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पुढचे काही दिवस या महिलेवर अशीच जबरदस्ती सुरु होती. आरोपीने व्हिडीओ अपलोड केला तर बदनामी होईल या भितीने तो तिचे लैंगिक शोषण करत होता. अखेर या महिलेच्या पतीला हे प्रकरण समजले. मात्र त्याने परिस्थिती समजून घेतली व पत्नीला साथ दिली. त्यानंतर दोघांनी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली.

7 likes 85 shares
WhatsApp