A
Ayaan Bhat
spiritual · marathi · spiritual
*बदनामी ची परिसीमा* एक गरीब माणूस रोज एका कागदावर " हे देवा ! मला *५०,०००* रुपये पाठवून दे" असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे. तो फुगा एका पोलीस स्टेशन वरुन उडत असे आणि पोलीस कर्मचारी रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत. एक दिवस पोलीस कर्मचा-यांनी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सर्व पोलीसांनी मिळून *२५,०००* रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले. दुस-या दिवशी पोलीसांना परत फुगा दिसला...फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक् झाले त्यामध्ये लिहीले होते... *हे देवा !* तुमच्या कडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण पोलीसां सोबत पाठवायला नको होते, त्यांनी मध्येच माझे २५,००० रुपये खाल्ले....😅😂😂😂
241 likes
35 shares