Back to feed
M
Manav Agarwal Family · Marathi · Family

बाप नावाचा देव लहानपणी बापाने हात धरुन शिकवलं प्रत्येक हट्टाला त्यांनी कष्ट करुन पुरवलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं शिकुन मोठ व्हाव म्हणून बालवाड़ी ते डीग्री हवा तो पैसा पुरवला स्वतः फाटकी चप्पल घालून आपल्याला शिकवलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं भांडण आपलं झालं तर बाबाच पुढे सरसावला प्रत्येक चुकीला माफ करुन संस्कारांचा काढा पाजला अर्धपोटी राहून आम्हाला मोठ्ठ केलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं मुलीच्या सुखासाठी तीच्या सासरच्यांना कमी काही पडेल म्हणून घर ही गहाण टाकलं कर्जात बुडून ही त्यांनी मुलीला सुख दिलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं प्रत्येकाच्या स्वप्नांचा होयबा होऊन राहीला समाजातल्या संस्कृतीचा निर्मिक तो जाहला पोरांसाठी त्यानं जीवाचं रान केलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं संकट आल मोठं तेव्हा "अरे बाप रे" ! हाच उद्गार काढला मोठ मोठ्या संकटांना मग बापच पुरे पडला नवस न करताच वरदान त्यानं दिलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ झाला जगाला तोंड देतांना पेटता निखारा जाहला. आपल्या कल्याणासाठी वाटेल ते केलं बाप नावाच्या देवाला आपण नाही ओळखलं 😇 बापाच आपल्या आयुष्यातील खरा देव😇..

230 likes 77 shares
WhatsApp