बाबा वर प्रेम करणाऱ्या सर्वांन साठी एक सुंदर रचना बाबा आहेत ना मी जन्माला आल्यावर, आईपेक्षाही हळुवार, मला घेतांना जाणवला मला प्रथमच आधारस्पर्श....बापाचा आणि वाटले आश्वासक, उबदार.... "बाबा आहेत ना!" तेंव्हापासून, सतत वाटत राहिली ओढ मला... बाबा या शब्दाची, नात्याची, मायेची कधी माझ्या चिमण्या बोटांनी धरलेल्या त्या उबदार हातातून, कधी पाठीवरून फिरणार्या त्या प्रेमळ स्पर्शातून, तर कधी, तुडुंब भरलेल्या मायाळू...खोल खोल हृदयातील स्पंदनांतून; राबणार्या, फक्त आमच्यासाठी रात्रंदिवस! नेहमीच वाटत राहिले..एक कुतुहल, ओढ, प्रेम आणि गरज त्या वडीलकीच्या नात्याची, जणू घराचे सरंक्षक मायेचे आभाळ कधी उबदार, कधी शीतल.... नेहमीच एक जाणीव निर्धास्त "बाबा आहेत ना!" कधी शाळेला सोडत, बोट धरून.. हळूच डोळे पुसत आणि यशाच्या वेळी; कौतुकाने जवळ घेउन, शाबासकी देत तर कधी आजारी पडल्यावर; जागत रात्रभर हात धरून जपत, मोठे होतांना फुटू पाहणारे; माझे व्यक्तिमत्व! माझ्या स्वप्नांच्या आणि त्यांच्या मायेच्या द्वंद्वात.. जि़कू देत मला; बळ देत, स्वतःहून आकाशापलीकडे उडण्याचे या सगळ्यांत; आधार मला, त्याच भक्कम सुरक्षित जाणिवेचा, मायेचा "बाबा आहेत ना! आज, आकाशापलीकडे, आठवणींच्या पाळण्यात डोकावून बघतांना होते जाणीव; त्याच त्यांच्या पहिल्या स्पर्शाची.... पण काळजीने "बाबा......आहेत ना!" आणि घेते धाव मन.. परत; ईवले बोट होऊन...आकाश पार करून पुन्हा त्या कुश, थकलेल्या पण तेवढ्याच प्रेमळ हाताच्या थरथरत्या मिठीत त्या हाताची उब सर्वस्वासह माझ्यात सामावत्,हळुहळु......पूर्णपणे! आणि मी तरीही समजावत स्वतःसह अश्रूंना "बाबा आहेत ना!" .. ... मात्र, आयुष्यात वाटते जेंव्हा आता खुप एकटे एकटे, थकून; जाणवत कमतरता पाठीवरून फिरणार्या प्रेमळ हाताची डोळ्यांतून वाहणारी आठवण टपटपत फोटोखाली; तेंव्हा.. जाणवतो तोच स्पर्श प्रेमळ, पहिल्यांदा झालेला तोच आधार....भरभरून माया देत एक अदृष्य आवाज शरीरभर "बाळा, थकलास का रे? उठ; बाबा आहे ना!!" जर तुम्हाला पण तुमच्या वडीलांचा आधार वाटत असेल तर एक बाबांनासाठी सुंदर कमेंट करा. LOVE YOU...... BABA....
96 likes
67 shares