बायको बरोबर भांडणाचे फायदे 😳 1. झोप आरामदायक होते : " ऐकताय ना? , लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा " सारख्या गोष्टी बंद. 2. पैशांची बचत होते : जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही. 3. तणावापासून मुक्ती : भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो . 4. आत्मनिर्भरता येते : भांडणानंतर स्वताहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं ,) आत्मनिर्भर होतो. 5.कामात व्यत्यय न येणं : भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे फालतू कॉल येत नाही , ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं. 6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती : एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते. 7. आपलं महत्व वाढते : भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते. 8. प्रेम वाढतं: आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच. मग काय विचार करताय एवढा.... आज होउनच जाउ द्या 😜😜😜👊✊👊✊
A
Atharv Joshi
humor · marathi · humor
109 likes
38 shares