Back to feed
A
Arjun Bose family · marathi · family

भयंकर उकाडा, लोकलची गर्दी. घरात शिरलो. सोफ्यावर अंग टाकले. सौ. ने पाण्याचा पेला दिला. हूश्श करेस्तोवर लेकाने प्रशस्तीपत्रक पुढे केले. मराठी ३८, इंग्रजी ३५, गणित ४० पुठचे काही वाचण्या पूर्वीच मी खेकसलो, मन्या ! काय मार्क हे, गाढवा, लाज वाटते का काही, दगड आहेस नुसता दगड... अहो पण जरा ऐकता का? तू गप्प बैस ! तूझ्या लाडानेच फुकट गेला आहे तो. नालायका, अरे बाप राब राब राबतो आहे आणि तुम्ही असे गुण उधळा. मुलगा गप्प. मान खाली. अहो ! तू गप्प रहा, एक शब्द बोलू नकोस. आज याला दाखवतोच... अहो! सौ. चा आवाज चढला. मी थोडा वरमलो. ऐकून तर घ्या ना जरा ! सकाळी माळा साफ करताना सापडलेली तुमचीच मार्कशीट आहे ती... भयाण शांतता...

92 likes 25 shares
WhatsApp