Back to feed
S
Sai Iyer Family · Marathi · Family

मी अजुनही शिकतोय जेव्हा घरातुन बाहेर पडतो स्टेशनवर थांबतो दिसतात मला चेहरे चेहरे लावलेले उसने हासु आणलेले गालात रुसु दाबलेले चिंतातुर आक्रासलेले पेटलेले फाटलेले हळु बोलणारे मोठ्याने चिडणारे चल ठेव फोन .. काहीच न बोलणारे खुप काही सांगणारे मी शिकतोय अजुनही त्याच्याकडुन ते भेटतात गोड बोलुन पाठीत खंजिर खुपणारे एकाचा हात धरुन दुस-या बरोबर प्रणयचेष्टा करणारे सत्य समजुन असत्याला कवटाळणारे राजरोज स्वताला नटवुन बाजारात मांडणारे स्वार्थापाई ईमान विकणारे सत्तालालसेपायी आंधळेपणा पसरवणारे भेटत राहतात मला शिकत राहतो मी सतत चांगल्या वाईट गोष्टी ! शिक्षणाला कीती बंदीस्त केलय आपण भव्य चार भींतीच्या आतचे शिक्षण तेच खरे असे गृहीत धरणारे सर्टीफीकेटचे कागद जमा करणारे विसरतात जग हीच शाळा जगणे हेच शिक्षण कधीतरी डोळे उघडे करा अन जगाकडे पहा जग सत्य आहे... सुंदर आहे!

46 likes 4 shares
WhatsApp