S
Saanvi Reddy
love · marathi · romantic
मी नव्हतच विचारल तिला तू कोण आहेस...? एवढंच माहीत होतं ती माझं प्रेम आहे पूजावं मनापासून देवाला मागावं प्रत्येक प्रार्थनेत तिला एवढी कसली ही नशा...? का बदलल्या होत्या सर्वच दिशा...? किती बदललो होतो आई-वडिलांना ही विसरलो होतो. त्यांना काय वाटतं माहीत नव्हतं मला फक्त तिचच व्हायचं होतं. त्यांना सोडेल एवढी मजल नव्हती प्रेमाची कल्पना मात्र दिली होती. होता हातात हात सोबत नजरेची भाषा खुप स्वप्न आणि खुप साऱ्या आशा. सगळच कसं तोडून ती गेली या वेळी बदलल्या नाहीत हरवल्या होत्या दिशा. मग मात्र वाटलं तू कोण आहेस..? हे विचारलं असतं तर........
184 likes
45 shares