J
Jiya Singh
spiritual · marathi · spiritual
मागे वळून बघतांना ....... मागे वळून बघतांना ....... दिसतात आपल्याच पाऊलखुणा चिखलाने बरबटलेल्या कितीही वेळा पुसल्या तरी वारंवार उमटलेल्या मागे वळून बघतांना ....... दिसतात आपलेच हात रक्ताने माखलेले किती वेळा धुतले तरी वारंवार रक्ताळलेले मागे वळून बघतांना ....... दिसतो आपला चेहरा काळवंडलेला कितीही स्वच्छ केला तरी ओळखूही न येणारा मागे वळून बघतांना ....... दिसतं आपलच मन भेगाळलेलं प्रीतीच्या शिंपणाविना कोरडच राहिलेलं
68 likes
43 shares