मागील आठवड्यात ‘बाकरवडी’ हा पदार्थ अगदी अचूक ओळखलात!! म्हणूनच, ‘बाकरवडी’ करुन पाहाण्यास उत्सुक असणा-या मैत्रिणींसाठी ही रेसिपी, ;) साहित्य- २ कप मैदा, २-३ मोठे चमचे बेसन, चवीपुरते मीठ, १ ते दीड चमचा तेल, १ छोटा चमचा ओवा. साहित्य(सारणासाठी): १ मोठा चमचा बेसन, १ छोटा चमचा तीळ व खसखस, १ छोटा चमचा आले(किसून), १ ते दिड चमचा लसून पेस्ट, ३ चमचे लाल तिखट, १ चमचा पिठी साखर, १ छोटा चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पूड, १ छोटा चमचा बडीशेप, १ चमचा किसलेले खोबरे, ४ मोठे चमचे बारीक शेव, मीठ पाककृती– मैद्याची पोळी: मैदा व बेसन एकत्र करुन त्यामध्ये मीठ व ओवा घालावा. तेल गरम करुन पीठात घालावे आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे व १५-२० मि. झाकून ठेवावे. (सारण): प्रथम खसखस व तीळ तव्यावर थोडे भाजून घ्यावेत, नंतर सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ एकत्र करुन १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावेत. (बाकरवडी): सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करुन १-२ चमचे सारण त्यावर पसरावे व घट्ट रोल करुन घ्यावा. सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावेत. नंतर गरम तेलामध्ये तळून बाकरवड्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात. :)
44 likes
78 shares