R
Reyansh Kumar
love · marathi · romantic
माणूस प्रेमात पडतो. त्यातला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याला भारावून टाकतो. आपण प्रेमाच्या व्यक्तीसाठी जगतो , हसतो , रडतो, आपल सर्वस्व त्याच्यासाठी होत. तो हसला तर आपण सुखी त्याच्या डोळ्यातील अश्रू म्हणजे आपली स्वतःच्या सुखाला तिलांजली. प्रेमात काही वेगळेपण रहातच नाही. जगण त्याच्यासाठी , झुरण त्याच्यासाठी सगळ काही त्याच व्यक्तीच्या अस्तित्वाशी बांधलेलं. मग एक क्षण असा येतो की त्याला आपल्या प्रेमाच ओझ ,अडसर वाटायला लागतो. हा अडसर कधी त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या मार्गातला असतो तर कधी त्याला अन्य कुणा नात्यासाठी आपल्याला सोडायचं असत. मग सुरु होतात शब्दांचे घाव , पण आपला भावनिक गुंता मात्र आपल्याला बाहेर पडू देत नाही.
26 likes
36 shares