A
Aarav Patel
love · marathi · romantic
माणूस पेरलं गाढव उगवलं कुत्र्याला फुटलं सींगं वाघ झाले मेंढरं नं कोल्हा मागतोया बाशिंगं ! काळरान सारं नापीक झालं पडीकात उगवलं धानं कोकीळा झाली बेसूरी अन् कावळा गातुया गाणं ! घूबड फुलवी पिसारा अन् मोर जागे रातीला शेळी करी कोल्हभूकं लांडगा फिरे तिच्या साथीला ! वानर सारे जमिनीवर पळती अन् हरिण चढ़े झाडावरं भुईमूग आला तूरीला अन् नारळ दिसे ताडावरं ! गाय जुंपली औताला अन् बैल देई दूधं मधमाशा झाल्या नाजुक फुलपाखरे काढती मधं !
151 likes
67 shares