*मित्रांनो,* *एक लहरी राजा होता.... त्याला आली लहर.... त्यानं प्रधानाला बोलावलं व म्हणाला : " गावात दवंडी पिटवा ... : जो माझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देईल त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून मिळतील "* *राज्यात दवंडी पिटली ... दरबारात सुवर्ण मुद्रांच्या लालचेनं सगळी लोकं हजर झाली. ... येताना प्रत्येकाला वाटलं आपणच येतोय दुसरं कुणी येणार नाही .. पण ... असाच विचार करून एकमेकाला न सांगता सगळे हजर झाले. ..* *राजानं विचारलं : " सगळे आले का ? " ..* *प्रधान म्हणाला : " हो ... फक्त एक शिवा लोहार आला नाही " ...* *राजा म्हणाला : " माझा प्रश्न हाच आहे, तो शिवा का आला नाही ? "* *सगळयांनी उत्तरे दिली.... कुणी म्हणालं, "त्याला गरज नाही." ... कुणी म्हणालं "त्याला अक्कल नाही तो कसा उत्तर देणार?" ... सगळयांची उत्तरे झाली. ...* *राजानं प्रधानाला विचारलं : " तुमच काय म्हणणं आहे? " प्रधान म्हणाले : " शिवा एक अत्यंत मेहनती लोहार आहे.... त्यानं विचार केला मला असा फुकटचा पैसा नको. मी मेहनत करूनच पैसे कमवीन. म्हणून तो आला नाही. "* *राजा खूप खूश झाला त्यानं पालखी पाठवून शिवाला बोलावून घेतले, ... त्याचा सत्कार केला आणि त्याला शंभर सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून दिल्या....* *मित्रांनो, तुम्हाला वाटलं ... असेल मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं, ... पण तसं नव्हतं. ...* *जेव्हा दवंडी पिटली गेली तेव्हा शिवा क्वार्टर 🍻 मारून झोपला होता...* *तात्पर्य-: " कधी कधी 🍻 दारू 🍻 पण नशीब घडवते. "* 😜😜 *! हसत रहा ; मस्त रहा !*
D
Diya Das
love · marathi · romantic
240 likes
14 shares