Back to feed
R
Riya Iyer friendship · marathi · friendship

मित्रांनो पावसात चिंब भिजलेली माझी ही कविता, माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. ही माझी सर्वात आवडती कविता आहे...बघा,कदाचित तुम्हाला देखील आवडेल... अचानक पावसाची सर आली, माझ्या मनाला चिंब भिजवून गेली... तुझ्या बरोबर भिजलेलो हे आठवले, आणि मुसळधार पावसात एकाच झाडाखाली थांबलेले आठवले, तसच भिजल्यावर पोटभर खाल्लेले आठवले, मला सोडून जाताना तुझे बावरलेले ध्यान आठवले नुसते... ढग दाटून आले तरी मला तुझी आठवण येते, पाऊस पडू लागला की तू माझ्या समोर उभी राहतेस... कशाला अजून माझ्या मनात दडली आहेस? आणि अशी अधे मध्ये मला त्रास देते आहेस? तू जाताना सगळे घेऊन गेली होतीस, मला काय माहित होते की, वाटेवर तुझ्या पाउलखुणा ठेवणार होतीस... तू गेलीस… पाला पाचोळा कुस्करावा तसा स्वप्नांचा चक्काचूर करून गेलीस… जगणे जगलो जिवंत क्षणांना त्या ‘आठवणी’ हि ठेवून गेलीस… भर पावसात, वा-याच्या स्पर्शाने पुन्हा आठवणीत आलीस... आता आलीच आहेस तर जावू नकोस… कारण... जगण्याची आशा पुन्हा जागृत केलीस

78 likes 49 shares
WhatsApp