Back to feed
M
Manav Joshi Friendship · Mixed · Friendship

माना कि थोडी sayco होती है । लेकिन bayco तो bayco होती है । बायको म्हणजे कोण असते ? बायको म्हणजे बायकोच असते . कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते , कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते , कधी ती अटीतटीने भांडणारी विरुध्द पार्टी असते . कधी ती समजून घेणारी मित्र असते, कधी त्रास देणारी डोकेदुखी असते , कधी मस्का लावणारी असते . कधी ती जवळ असावी असे वाटतांना गैरहजर असते. कधी न सांगता समजून घेते, तर कधी गैरसमज करून घेते, कधी मूलांची काळजी करते, कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते, कधी नव-याला नावं ठेवते, कधी नव-याचा पगार वाढवुन सांगते. कधी फिरायला नेल्यावर नखरे करते, कधी हट्टाने हौस पुरवून घेते, कधी हौसेने नवीन पदार्थ करून खाऊ घालते. .... कधी शॉपिंगने बेजार करते, कधी नव-यासाठी कौतुकाने काहीतरी खरेदी करते, कधी कोणाची गुपितं सांगते , कधी कोणाला कळु न देता गुपचूप कारभार उरकते. कधी तंबी देऊन घराबाहेर सोडते, कधी घरी यायची वाट बघत बसते. कधी सरळ सुत असते , तर कधी संशयाचे भूत असते , कधी नव-याला लगाम घालु पाहते, कधी नव-यावर प्रेमाचा वर्षाव करते. कधी शेळी तर कधी वाघ असते, कधी आंबट तर कधी गोड असते . कधी न म्हणते---की आज मी दमले, दोन पेग मारते, कधी न संपणारी घराची ऊर्जा असते कितीही भांडली तरी मुकाटयाने जेवायला घालते. बायको कशीही असली तरी वरच्याने बरोबर शोधून best match म्हणून आपल्याशीच जोडी लावून दिलेली असते . म्हणूनच सांगतो मित्राहो--- नल-दमयंती, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनु आणि आर्ची-परश्या विसरून जा, आणि आपआपल्या बायकांना जीव लावा, काय करायचे तेवढे प्रेम बायकोवरच करा. माना कि थोडी sayco होती है । लेकिन bayco तो bayco होती है । *बायकाे* नावाचं तुफान मोठं विचित्र असतं मित्रा, ते *नवरा* नावाच्या इकडेतिकडे भिरभिरणा-या *फुलपाखराला* एकाच फुलामध्ये गुंतवून ठेवत. आपण आजारी पडलो तर या *तुफानाला* झोप लागत नाही. आपण बाहेरगावी जातो तेव्हा हे तुफान *देहाने तर घरात* असतं पण *मनान*ं ते आपल्याभोवती फिरत असतं. आपण उदास असतो नां तेव्हा त्याच्या *ओठावर* *हसु फुलत नाही* आपण आनंदात असताना या तुफानाचं *दु:ख* चेह-यावर येत नाही. थोडक्यात काय तर या तुफानमुळेच *आयुष्यात चैतन्य* आहे. बाहेरच्या *तारांकीत* जगात कितीही फिरलो तरी संध्याकाळी घरी जाण्याची ओढ लागते नां त्याचं कारण हे तुफानच आहे. *साठीनंतरच्या वयात* या तुफानाचं खरं महत्व समजतं. सगळं *गणगोत विरोधात* गेलं तरी हे तुफान आपला हात सोडत नाही. आपल्या पोटात घास जाताे तेव्हा या तुफानाला ढेकर येतो. *उतरत्या वयात* आपल्याला जगायचं कारण फक्त आणि फक्त एकच असतं ते म्हणजे हेच "तुफान"...! पाहीजे दोस्ता पाहीजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक *तुफान* पाहीजे. Dedicated to all _*Women"s​*_

23 likes 28 shares
WhatsApp