Back to feed
R
Rudra Verma Love · Marathi · Heartbreak

मनाचे मलाही कळेना मनासारखे ते वळेना मिठी उष्ण होती तिची पण कसा देह माझा जळेना अता वाटते भय सशांना कुणी कासवांसह पळेना जरा टोचले टाचणीने तरी छत नभाचे गळेना जुने व्रण नखांनी खुरडले युगाची जखम भळभळेना तिचा राग आहे फुलांवर अता सायली दरवळेना इशारे तिचेही समजलो कधी तोल माझा ढळेना किती सत्य पोटात लपवू जराही मला मळमळेना कळसही हलावा तुझा पण हरी सावळा तळमळेना ...शब्दसखा..

0 likes 0 shares
WhatsApp