Back to feed
A
Asha Joshi humor · marathi · humor

मनावर घेऊ नका फक्त हसा 😂😂😂😂😆😆😛😛😛 एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही! एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ?? नवरा- आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस महाबळेश्वरला हनिमूनला गेलो होतो. तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली.. ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली "हे तुझ पहिल्यांदा झालं", थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुस-यांदा झालं" आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं. मी ओरडलो, " ए बावळट, ! .....।तू घोड्याला मारलस ? पागल! " तेव्हा ती मला रागात बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच ... साधा वाद पण नाय केला कधी .. आम्ही अगदी आनंदी संसार करतो 😁😜😜😳😉😉😂😂😂😂😂😂😂😂😂😂👫

187 likes 4 shares
WhatsApp