Back to feed
P
Prisha Mishra family · marathi · family

मराठी किती संपन्न भाषा आहे पहा 👇 एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न : "दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए" या वाक्याचं आपल्या मातृभाषेत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे.., विद्यार्थी-१ (पुणे) ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली... विद्यार्थी-२ (नाशिक) ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...! विद्यार्थी ३ (मुंबई) दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली सेंड करुन परतीची लोकल पकडलीस...! विद्यार्थी-४ (अकोला) मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन निंगुन गेली विद्यार्थी-५ (अमरावती) कलिजाचे मार कुटके कुटके केले माह्या, अन दातकाड काहाडत कुठं चाल्ली वं ! विद्यार्थी-६ (यवतमाळ) निरे तुकळे केलेना हिर्दयाचे, न वरुन जाता जाता बत्तिशी दाखुन राह्यली..आं !! विद्यार्थी-७ (वाशिम) कायजाच्या पार चिंध्या करून टाकल्या माहया, अन हेंबाडथुत्री दातकड विचकत जाऊन राहाली भैताड़ लेकाची विद्यार्थी-८ (बुलढाना) लांग चिथडे करुन माया कायजाचे वरुन लय दातं इचकून रहाली तु तं.. आन चाल्लि लगे.. विद्यार्थी ९ (वर्धा) बाप्पा !! पार चिटोरे चिटोरे केले पोट्टिन कायजाचे अन बगा कशी जाऊन रायली फिदिफिदी हासंत विद्यार्थी १० (नागपूर) दिलची बोटी बोटी करुन गालात हासत हासत च्याल्ली न बे ... विद्यार्थी ११ (धुळे) काळीज ना तुकडा तुकडा करी सन गाल गाल मा हसी सन तरफडली बेरड ! विद्यार्थी १२(लातूर) : आरं बाबो, अगुदर तर काळजाची पार वाट लावली ! वरनं माज्याकड बगुन दाताड इचकत निगुन गेली, च्या मायला...! विद्यार्थी १३ (मालवण) : मेली अवदीसा नायथयली..., तेचा त्वांडार शिरापडली ती..., तेच्या आवशिक खाली कोल्यान..., माझा काळीज नांगरुन.., खिदळत - खिदळत वाटेक लागला ता अक्कर माशी प्वार...!!!

137 likes 88 shares
WhatsApp