Back to feed
A
Ayaan Sharma Family · Marathi · Family

मुले आणी बायको रात्री गाढ झोपुन जातात, अगदी निर्धास्तपणे,... कुठलीच काळजी नसते त्यांना, त्याचे ऐकमेव कारण म्हणजे घरातला कूटुंब प्रमुख, तो जाे पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्या कुटूंबासाठी तो आधारवड असतो, ज्या वेळी त्याचे कुटूंब निर्धास्थपणे झोपलेलं असते त्यांना विश्वास आहे आमची जबाबदारी घेणारा कुटूंबप्रमुख खंबीर आहे, पण त्याच वेळी तो मात्र जागा असतो, तिच ऐकमेव रात्रीची वेळ त्याला विचार करण्यासाठी अनुकुल असते.... मुलांच्या भविष्याची, कुटूंबाच्या उभारणीची, अनेक विचाराचे चक्र त्याच्या डोक्यात थैमान घालत असते, नकळत त्याला डोळा लागतो आणी तो झोपुन जातो, रात्री बेरात्री जाग आली तर तो मुलांकडे आणी बायकोकडे पाहत असतो, त्यांच्या अंगावरचे पांघरून सावरुन परत तो झोपतो, उद्याचे स्वप्न पाहात ....! पुरूष त्याच्या मनातल्या भावना पटकन बोलुन दाखवत नाही, रडता येत नाही , म्हणुन कुढत आणी काळजीत जिवन जगत असतो...... ही एका कूटूंबाप्रती जबाबदार पुरूषाची लक्षणे आहेत, कुटुंब जस जसे मोठे होत जाते तशी कुटूंब प्रमुखाची जबाबदारी वाढत जाते,... संसार करणे आणी तो निभावणे वाटते तितकी साधी आणी सोपी गोष्ट नसते. संसाराची किंमत त्यांना विचारा ज्यांचा संसार अर्धवट राहीलाय, कधी अकाली निधनाने पुरूष तर कधी स्त्री संसारातून बाहेर पडते..... लग्न करुन बायकोला घरी घेऊन येणे व दोन मुलांना जन्माला घालणे याला पुरूष म्हणत नाही.. मंडळी, पुरूष त्यालाच म्हणतात ,, जो कूटूंबाची पुर्ण जबाबदारी पार पाडून बायकोची आणी मुलांची सर्व स्वप्ने साकार करतो, ..... समाज्यासाठी तुम्हाला काही करता आले नाही तरी चालेल.....! पण स्वताःच्या बायको मुलांसाठी आपल्या आई वडीलांसाठी तुम्ही कुटूंबातले हिराे म्हणून जगले पाहीजे, एक आदर्श पती, आदर्श बाप आणी आदर्श मुलगा हिच ओळख किमान कूटूंबाप्रती प्रत्येक पुरूषाची असावी..... पाच मिनिट वेळ काढुन वाचा पटलं तर पुढे पाठवा...... 🙏🌹🙏

236 likes 29 shares
WhatsApp