D
Diya Joshi
humor · mixed · humor
मुलगी : कसा होता MPSC चा पेपर? मुलगा : अवघड मुलगी : तू संपूर्ण पुस्तक वाचलं होतंस ना? मुलगा : (वैतागून) तू सैराट पहिला ? मुलगी : विषय बदलू नको मुलगा : तू सैराट पहिला का ? मुलगी : हो पहिला. पुढे बोल मुलगा : पूर्ण पहिला ? मुलगी : हो पूर्ण पहिला… इंटरवल च्या जाहिराती पण पहिल्या … आता बोल मुलगा : मग सांग प्र १. आर्चीने पहिल्यांदा चित्रपटात कोणती भाजी केली होती? अ) मेथी ब) शेपू क) भेंडी ड) यापैकी नाही प्र २. आर्चीने किती ठिपक्यांची रांगोळी काढली होती? अ) १६ ब) १८ क) २४ ड) २६ प्र ३. बिली बाऊडर ला म्हातारीने किती फटके मारले? अ) ३ ब) ४ क) ५ ड) ६ प्र ४. इंग्लिश मध्ये सांगू का? हे वाक्य आर्ची किती वेळा बोलते? अ) ६ ब) ७ क) ८ ड) ९ प्र ५. खूळखुळ्याची फाटलेली चड्डी कोणत्या कंपनीची होती? मुलगी : खरच खूप अवघड असतात का MPSC चे पेपर ?
43 likes
60 shares