R
Riya Chauhan
humor · marathi · humor
मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय… बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन. … सकाळी टीचरच्या घरी… बाबा : नमस्कार टीचर. ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फीआणलीये. टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल? बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली असा मुलाने निरोप दिला मला; पण तो लहान आहे आणि कुल्फी वितळली असती म्हणून… टीचर : तुमचा मुलगा लहान आहे हे मलाही माहीत आहे. पण तो अजून बोबडं बोलतो हेही तुम्हाला माहीत हवं; मी कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली त्याला! 😢🤔😟🤓😄😆😂
20 likes
30 shares