Back to feed
S
Saanvi Kumar love · marathi · romantic

मालतीबाई आणि त्यांचे पती माधवराव यांचे त्या दिवशी कशावरून तरी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे माधवराव वैतागले होते. त्यांनी घरात त्या दिवशी जेवण घेतलेच नाही. परंतू शेवटी भूक ही लागणारच. परंतु बायकोकडे मागायचे कसे? या हिशोबाने ते समोरच्या इराण्याच्या हॉटेलात गेले. तेव्हाते जरा तावातच होते. तेथे एक सुंदर मुलगी वेटर म्हणून कामाला होती. तिने माधवरावांना विचारले. "व्हॉट कॅन आय डू सर" तिचा मंजूळ आवाज ऐकून माधवराव पघळले. व ते तिला म्हणाले. "मला दोन प्रेमाचे शब्द आणि काही तरी खायला आण, भूक लागलीय." माधवरावांची ऑर्डर घेऊन ती तरूणी गेली आणि येताना तिने प्लेटमध्ये दोन उकडलेली अंडी आणून त्यांच्यासमोर ठेवली आणि म्हणाली. "डियर माधव ही अंडी खाऊ नका, ती आठ दिवसांची शिळी आहेत. तुम्हाला गडे त्रास होईल की नाही".

219 likes 58 shares
WhatsApp