Back to feed
S
Sai Das Love · Marathi · Heartbreak

मुलींनी तर हे नक्कीच वाचावे, विद्यार्थी लोकांनी पण वाचावे : >> हे वाचल्यावर बहुतेक मुलींना माझा राग पण येईल .. पण जे मनाला वाटलं ते तुमच्या समोर व्यक्त करतोय.!! मी प्रत्येक मुलींचा respect करतो पण तरीही एक गोष्ट सांगु इच्छितो. ߘ:) मुलींचे मुलांबद्दल चे विचार..? मुलं हि "टपोरी असतात", "खोटारडी असतात", आणि सर्वात जास्त बोललेली वाक्य म्हणजे.."सगळे मुलं ही सारखी असतात " खर तर मुलं ही सगळे सारखी नसतातच... आणि सगळीच मुलं वाईट नसतात...!! मुळात सगळेच मूल चांगली असतात हे पण बरोबर नाही...!! मुलींना Hurt झालं, की त्या ढसाढसा रडतात... पण त्यांना काय माहित.?? मुलं Hurt झाल्यावर, तोंडावर दु:ख न। दाखवता कुठेतरी एकांतात नाहीतर रात्री अंथरुणात रडतात..!! जिच्यावर प्रेम असतं, तिला सुखी ठेव रे देवा, अशीच देवाला प्रार्थना करतात..... पण.. मुलींना मात्र मुलं वाईटच दिसतात...!! प्रेयसीच्या समोर शान वाढावी म्हणुन, किती झोल करतात, मात्र तिने धोका दिल्यावर, मित्रांकडुन घेतलेलं उसणंच फेडत असतात..!! आईबापा पेक्षा जास्त, आपल्या Gf च ऐकतात.. आणि मुलींना वाटतं मुलं वाईट असतात...!! जिवापाड प्रेम करतात.. आणि काहीही करायला तयार असतात..!! पण.. साल..काही....का हीतरी चुक काढुन, सगळा आत्मविश्वासंच संपवतात.....√√ स्व तः निट अभ्यास करुन, चांगले गुण मिळवतात, पण मी फक्त टाईमपास करत होते.... असं म्हणुन, त्याच्या अभ्यासाची वाट लावतात.....√√ कारण त्यांना वाटतं, "सगळी मुलं सारखीच असतात...!!" मुलीच लग्न करायला घेतल्यावर.. Bf ला नकार देऊन सगळा दोष त्यालाच देतात, पण त्यांना कायं माहित जिच्या सोबत लग्न करणार आहोत, तिला खुश ठेवण्यासाठी किती धडपडत असतात..!! आणि त्यांना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात...!! आयुष्याची राखरांगोळी करुन जेव्हा.... त्या मुली जातात तेव्हा, तिची बदनामी होवु नये म्हणुन, सगळं मुकाट्याने सहन करतात...!! आणि त्यांना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात...!! ती गेली तर जाऊ दे...दुसरी शोधु, असं फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतात.... पण एकांतात बसुन तिच्या आठवणीत रडतात...आणि कोणी पाहिल्यावर .... "काय नाही रे डोळ्यात कचरा गेला म्हणुन पाणी आलं " ...असं म्हणणारी मुलंच असतात..!! आणि मुलींना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात..!! खरंतर १०० मधुन, ७५ मुलं वाईट असतात... पण या ७५ मुलांची वाट लावुन....त्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात..!! आणि त्यांना वाटतं, मुलं वाईट असतात....!! कधीतरी मुलांच्या भावना, खरया मनाने समजून घ्या... कारण हाताची ५ ही बोटं सारखी नसतात...आणि सगळीच मुलं वाईट नसतात..!! शेवटी एवढचं कबुल करतो.. मुल ही मुल असतात... पणं सगळी मुल वाईट नसतात.. !!! मित्रांनो पटलं तर... नक्की तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.. . Join this App

0 likes 0 shares
WhatsApp