Back to feed
I
Ishaan Patel Family · Marathi · Family

मुलीवर जन्मदात्याचा अत्याचार मीरा रोड : जेमतेम १५ वर्षांच्या आपल्याच मुलीला शीतपेयातून मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीची सावत्र आई घर सोडून गेल्याने ती बिगारी काम करणारे वडील व ६ वर्षांच्या लहान बहिणीसह राहत होती. मद्यपान करणाऱ्या बापाने शीतपेयातून तिला मद्य पाजले. गुंगीत असताना त्याने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर, तो आपल्या दोन्ही मुलींना घेऊन कामासाठी नाहूर येथे गेला. तेथे मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला केईएम रुग्णालयात नेले असता तिला दिवस गेल्याचे निष्पन्न झाले. तेथे तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र, रुग्णालयाने ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर प्रकरण काशिमीरा पोलीस ठाण्यात चौकशीकरिता वर्ग केले गेले. २ मे रोजी बलात्कार व बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. मुलीने चौकशीत वायरमन अतुल सहानी याने बलात्कार केल्याची बतावणी केली. पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने पुढे फारसा तपास झाला नाही. वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्यास निरीक्षक धनाजी कलंत्रे यांना सांगितल्यावर १७ आॅगस्टपासून तपासाला वेग दिला. त्या वेळी पीडिता वडिलांसह दादरजवळील नायगाव येथे एका बांधकाम साइटवर राहत असल्याचे पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतले असता वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक कबुली तिने दिली. (प्रतिनिधी)

173 likes 21 shares
WhatsApp