Back to feed
N
Nikhil Malhotra friendship · mixed · friendship

महाराष्ट्र राज्य सैराट निरीक्षण परीक्षा मंडळ 2016****** _________________________ विषय : सैराट वेळ: 3 तास गुण : 100 ~ सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक...... ~कॉपी करु नये...... ---------------------------------------- ✒प्र. 1ला. निबंध लिहा. (कोणताही एक) गुण : 10 1) सैराट ची कहानी लिहा. 2) प्रदीप (लंगडं उर्फ बाळ्या) ची प्रेमकथा. 3) आर्ची-परश्याचे चांगले दिवस. ✒प्र. 2रा. रिकाम्या जागा भरा...... गुण : 05 1) परश्याला हात तर लाव नाय तुज थोबाड फोडलं तर नावाची................नाय. 1) आनी 2) सपनी 3) आर्ची 2) अधीर झालोया मंग................झालोया. 1) ऊगीर 2) फुगीर 3) बधिर 3) आयघाल्या आस्सील................उभा फाडील तूला. 1) मास्तराचा 2) दादाचा 3) पाटलाचा 4) कुणाच्या................किती आंधार हाय हे समध्या तालुक्याला माहीत हाये. 1) दिव्याखाली 2) बुडाखाली 3) झाडाखाली 5) मराठीत सांगितलेलं कळत नाय?...............मधे सांगू? 1) इंग्लिश 2) हिंदी 3) तेलुगू ✒प्र. 3रा. योग्य शब्द निवडा. गुण : 05 1) झालय झिंग झिंग................ 1) सिंगाट 2) पिंगाट 3) झिंगाट 2) कधी होणार तू रानी माझ्या................ 1) लेकराची आई 2) लेकराची माई 3) लेकराची दाई 3) आर्ची कॉलेजला.........वर जायाची 1) ट्रॅक्टर 2) बुलेट 3) सायकल 4) तुझ्यासारखं.........खाऊन मरण्यापेक्ष्या आर्चीच्या प्रेमात जीव गेलेला बरा. 1) गुटखा 2) तंबाखू 3) सुपारी 5) सगुणा आत्या कोणाला मारते? 1) बिली बाऊडिंगला 2) मंग्याला 3) सल्याला ✒प्र. 4था. एक वाक्यात उत्तर द्या. गुण : 20 अ) अर्चना पाटिल कोण व कशी होती? ब) आर्चीला रेल्वेतुन जाताना काय झाले? क) सैराटमध्ये आर्चीने कोणत्या शिव्या दिल्यात? ड) आर्ची - परश्याला कोणी मारले? ई) सैराटमधील कोनता सीन नागराजच्या रियल लाईफशी निगडित आहे? फ) परश्या आर्चीला कधी सॉरी म्हणतो? ग) प्रिंसच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो त्याच्या कोणत्या स्पेशल मित्राबरोबर डांस करतो? ह) सपनी कागदात गुंडाळून काय फेकते? य) सैराट मध्ये परश्याच्या आईचं व बहिणीचं नाव काय असते? ज) परश्या - आर्चीच्या लेकराच नाव काय? ✒प्र. 5वा. चुक की बरोबर लिहा. गुण : 05 1) लंगडयाला सपनीन चिट्टी दिली. 2) आर्ची रोज जेवण बनवायची. 3) प्रिंसने मास्तराच्या थोबाडीत मारली. 4) पाटिल लावणी महोत्सवाला जायचं टाळून मॅचच्या बक्षीस वाटपाला आले होते. 5) मॅच चालू होती तेंव्हा लाईट गेली होती. ✒ प्र. 5 वा (ब). 80 ते 100 शब्दांत उत्तरे लिहा. गुण : 15 1) आर्चीला काय काय आवडत असे. 2) आनीच्या (आर्चीची मैत्रीण) वागण्या - बोलण्याबदल माहिती लिहा. 3) आर्चीने कश्याप्रकारे परश्याला रानामध्ये बोलावले? 4) आर्चीन परश्याला मारण्यामागचं कारण काय होतं? 5) मंग्या ने कश्या पद्धतीने मदत केली? ✒ प्र. 6वा. टिपा लिहा. गुण : 40 1) आर्ची-परश्याचा सुखी सौंसार. 2) "फँड्री"तल्या "जब्या"ची अन् प्रिंसची वाढदिवस भेट व आनंद वर्णन. 3 ) सैराट मधील जातीव्यवस्था. 4) सैराटचा शेवट. ALL THE BEST 😝🙄😇😆😂🤗

105 likes 6 shares
WhatsApp