Back to feed
K
Kunal Joshi Love · Hindi · Romantic

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही, सजून आली पाती फुले लाजरी बघुन कुणाचे, हळवे ओठ स्मरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणी ही केली काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली सहा ॠतूंचे सहा सोहळेऽऽ, येथे भान हरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे बाळाच्या चिमण्या ओठातून, हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजणासाठी, गाणे गात झुरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळपानावरती, अवघे विश्व तरावे.. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

52 likes 28 shares
WhatsApp