Back to feed
K
Kiara Mehta Family · Marathi · Family

रोज पत्नीचे चरणस्पर्श करणाऱ्या दिल्लीच्या महिला कल्याणमंत्र्यांची अश्लील सीडी समोर दिल्लीच्या केजरीवाल सरकारवर आजवरचा सर्वात मोठा डाग लागला आहे. बुधवारी संध्याकाळी दिल्लीचे महिला बालविकास मंत्री संदीपकुमार यांची दोन महिलांसोबतची आक्षेपार्ह सीडी समोर आली. प्रकरण तापताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संदीपकुमार यांची हकालपट्टी केली. विशेष म्हणजे हेच संदीपकुमार गतवर्षी महिलादिनी एका कार्यक्रमात म्हणाले होते, ‘मी महिलांचा इतका सन्मान करतो की रोज पत्नीला चरणस्पर्श करूनच घराबाहेर पडतो.’ सीडी प्रकरणात रात्री उशिरापर्यंत संदीपकुमार यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण जारी झाले नाही. त्यांच्या कार्यालयाने सांगितले की, संदीपकुमार आजारी आईला भेटण्यासाठी गावाकडे गेले आहेत.  ९ मिनिटांची सीडी, मंत्र्याने स्वत: तयार केल्याचा दावा मिनिटांच्यासीडीत संदीप महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत. त्यात ११ छायाचित्रे. शेवटी संदीप कॅमेरा वळवत असल्यामुळे व्हिडिओ त्यंानीच बनवल्याचे वाटते. सीडीसोबतचिठ्ठी : ‘महोदय, मलाकाही छायाचित्रे व्हिडिओ मिळाला. हे दिल्लीचे मंत्री संदीपकुमार यांचे आहेत. यावर योग्य ती कारवाई केली जावी.’अशी चिठ्ठी आहे.  चार वर्षांपासून केजरींसोबत संदीप२०१२ मध्ये केजरीवाल यांच्याशी जोडले गेले. ते २०१३ ची निवडणूक हरले. २०१५ मध्ये सुलतानपूर माजरातून जिंकले. त्यांनी डीयूमधून पदवी आणि मेरठमधून कायद्याची पदवी संपादन केली आहे.

113 likes 60 shares
WhatsApp