लेक चालली सासरला... गरीबा घरची लेक भाऊबीज करून नांदायला जाताना आई पिशवी भरुन डाळी कडधान्य अन कालवणाला देते ... त्या बरोबर मायेचा हात पाठीवर असतोच.. आईच्या डोळ्यात अश्रू असतात तर भाऊ आणि बाप कोपऱ्यात उभा राहून मनातल्या मनात रडत असतात... भाऊबीजेला लेक मोकळ्या हातान माहेरी आलेली असते पण जावई पण चांगला असतो त्याला सासर ची परिस्थिती माहिती असती , जावई एकच मागणं करतो पोरासनी चार मक्याची कणस द्यावीत ... जावई चार कणस मागतो अन सासरा पिशवी भरून देतो अन जगाला ओरडून सांगतो जावई माझा भला...
81 likes
32 shares